साखरवाडी : दि. साखरवाडी येथील उद्योजक संजय भोसले यांच्या निवासस्थानी दिवाळीनिमित्त बालकलाकारांनी सिंधुदुर्ग ह्या शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यातील गड निवडला आणि त्याची प्रतिकृती तयार केली असून हा किल्ला सर्वांना आकर्षित करून घेत आहे दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने घरोघरी गड-किल्ल्यांची प्रतिकृती साकारली जाते
छत्रपती शिवाजी महाराजांनी याच गड किल्ल्यांचा उपयोग हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केला होता महाराजांचे मावळे जीवाची बाजी लावून मोगलांच्या विरुद्ध त्याकाळी लढले असल्याने आपल्याला त्यांनी स्वराज्य मिळवून दिले याची आठवण आताच्या पिढीला विसरता येणार नाही या गडकिल्ल्यावर दिवाळी साजरी करता यावी ह्या हेतूने अनेक वर्षापासून दिवाळीनिमित्त आपल्याच घरासमोर अश्या प्रकारे गड किल्ल्यांना साकारून बाल गोपाळ दिवाळीचा आनंद घेत असताना आपल्याला दिसत असतात
संजय भोसले यांच्या गणेश नगर येथील त्यांच्या शाहीवाड्या पुढे या बालकलाकारांनी सिंधुदुर्ग या किल्ल्याची प्रतिकृती उभारली या बाल कलाकारांपैकी अंश माने, शांभवी कदम, आदित्य खुडे, आदित्य खोमणे करण डुड्डू, यशोधरा, देवराज, स्वराज, वेदांत भोसले यांनीही सिंधुदुर्ग किल्ला बनवण्यात परिश्रम घेतले याबद्दल सर्वांनी या बाल मित्रांचे अभिनंदन केले आहे