साखरवाडी वार्ताहर : सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. शंभूराजे देसाई साहेब यांची सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या सत्कार सोहळ्याला जिल्ह्यातील सहकार, राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी महानंदाचे उपाध्यक्ष डी. के. पवार, सातारा जिल्हा मजूर फेडरेशनचे चेअरमन अंकुशराव साळुंखे पाटील, युवा नेते शरद जाधव, डॉक्टर भिसे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*सत्कार आणि शुभेच्छांचा वर्षाव -*
यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालकमंत्री शंभूराजे देसाई साहेब यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा बँकेच्या संचालकपदी त्यांची निवड झाल्याने जिल्ह्यातील शेतकरी, सहकार क्षेत्र आणि सर्वसामान्य नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
पालकमंत्री देसाई साहेब यांच्या अनुभवाचा आणि मार्गदर्शनाचा फायदा जिल्हा बँकेला आणि शेतकऱ्यांना निश्चितच होईल, असा विश्वास यावेळी मान्यवरांनी व्यक्त केला.
याच कार्यक्रमात सर्व मान्यवरांनी एकमेकांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. दिवाळी सणाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत सहकार क्षेत्रातील विविध विषयांवर तसेच जिल्ह्याच्या विकासावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
कार्यक्रमाला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Tags
Sakharwadi