बिबट्याच्या हल्ल्यात शेळी जखमी
फलटण प्रतिनिधी : साखरवाडी पिंपळवाडी जवळील डंकीन वस्तीवर गेल्या अनेक दिवसापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून येथील नागरिकांचे जीवनमान संपूर्णपणे भयभीत झाले असताना बिबट्याचे हल्ले वरचेवर चालूच आहेत मध्यंतरी बिबट्याने रात्रीच्या अंधारात एका मेंढपाळाच्या कळपावर हल्ला करून तेथील मेंढी ठार करून उसाच्या शेतात बिबट्या पळून गेला त्यानंतर त्याचं रात्री डंकीन वस्तीवरील एका शेळीवर हल्ला करून बिबट्याने शेळी जागीच ठार केली आणि त्यानंतर बिबट्या शेजारील भिंतीवरून उडी मारून पळून गेला असताना वन विभागाचे अधिकारी तेथे आले त्यांनी पाहिलं त्यानंतर वन विभागाच्या आणि रेस्क्यू टीमच्या वतीने डंकण वस्तीवरील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करून बिबट्या च्या संदर्भात रेस्क्यू टीमने मार्गदर्शन केले ही परंतु बिबट्या आपल्या पिल्लासह फिरत असल्याचे काही नागरिकांचे म्हणणे आले आहे पिल्लासह बिबट्याचे दर्शन झाल्याचे काहींनी सांगितले आहे असे असताना काल रात्री डंकीन वस्तीवर पुन्हा एकदा बिबट्याने एका शेतकऱ्याच्या शेळीवर रात्रीच्या वातावरणामध्ये हल्ला केला अशा परिस्थितीत शेजारी असणाऱ्या कुत्र्याच्या सावधगिरीमुळे बिबट्याच्या हल्ल्यातून शेळीचा थोडक्यात बचाव झाला परंतु शेळी जखमी झाली आहे
वन विभागाने याकडे लक्ष देण्याचे गरज असून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी येथील शेतकरी ग्रामस्थांनी केली आहे
Tags
Sakharwadi