हिंदी विषयात डॉ. श्री.महेश शंकर रिटे यांना पीएच.डी. पदवी प्रदान...
होळ ता. फलटण जि.सातारा येथील डॉ . महेश रिटे यांना
गुरू काशी विद्यापीठ, पंजाब येथे संशोधन कार्यास यश
हिंदी विषयामध्ये उल्लेखनीय संशोधन कार्य पूर्ण केल्याबद्दल यांना गुरू काशी विद्यापीठ, पंजाब यांच्याकडून पीएच.डी. (विद्यावाचस्पती) ही मानाची पदवी प्रदान करण्यात आली आहे.
त्यांच्या संशोधन प्रबंधाचे शीर्षक 'संजीव के कहानियों में श्रमिक जीवन का अनुशीलन' असे असून, त्यांनी हा संशोधन प्रबंध मार्गदर्शक डॉ. राकेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पूर्ण केला.
साहित्याच्या माध्यमातून श्रमिक जीवनाचे वास्तव, संघर्ष, सामाजिक परिस्थिती आणि विविध पैलू अभ्यासण्याचा महत्त्वपूर्ण प्रयत्न त्यांनी या संशोधनातून केला आहे.यापूर्वी त्यानी MA,Bed, M.A M.Ed हिंदी यां विषयातून शिक्षण घेतले आहॆ. अतिशय संघर्ष करीत हे यश संपादन केले आहॆ.
त्यांच्या या शैक्षणिक यशामुळे कुटुंबीय, मित्रपरिवार, सहकारी, शिक्षकवृंद तसेच शैक्षणिक व साहित्यिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
त्यांच्या जिद्द, चिकाटी, अभ्यासू वृत्ती आणि अथक परिश्रमाचे हे यशस्वी फलित आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, पुढील शैक्षणिक व साहित्यिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.