महिला सक्षमिकरण अभियान साखरवाडीत संपन्न

महिला आर्थिक विकास महामंडळ सातारा मार्गदर्शित ओम साई लोकसंचालित साधन केंद्र फलटण, ग्रामपंचायत साखरवाडी, सावित्रीबाई फुले ग्रामसंग साखरवाडी यांच्यावतीने आज दिनांक 27/ 11/2026 रोजी साखरवाडी येथे जेंडर व न्यूट्रिशन हेल्थ कार्यक्रमांतर्गत गाव पातळीवर ,लिंगभेद समानता ,महिला सक्षमीकरण, आहार पोषण विषयक व स्त्री-पुरुषांची घर संपत्ती यावर संयुक्त मालकी हा जनजागृती पर कार्यक्रम आधार ग्रुप आळजापूर यांच्या वतीने साखरवाडी येथे पथनाट्याद्वारे सादर करण्यात आले. तसेच महिलांचे हिमोग्लोबिन तपासणी घेण्यात आली. यावेळी साखरवाडी ग्रामपंचायत सदस्य श्री हरीश गायकवाड, श्री संग्राम अवतारे, तंटामुक्ती अध्यक्ष विकी भोसले, पत्रकार किसन भोसले, कार्यकारणी संगीता गायकवाड , नीलम धोंडगे , ओम साई लोकसंचालित साधन केंद्र फलटण व्यवस्थापक सौ .शीला घाडगे लेखापाल सौ पूजा अडसूळ उपजीविका सल्लागार श्री सुशांत चोरमले संयोगिनी सौ. दिपाली मोरे , सीआरपी वर्षा काकडे, व वैशाली खलाटे उपस्थित होत्या. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खामगाव, व साखरवाडी गावातील महिला बचत गटातील सदस्य, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले

Post a Comment

Previous Post Next Post