श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठान - साखरवाडी यांचे वतीने भव्य गणपती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन:::::::::::::::::::: साखरवाडी येथील अनेक सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री गणपत विठ्ठल भोसले सर प्रतिष्ठानने याही वर्षी भव्य श्री गणपती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे.स्पर्धेचे हे दुसरे वर्ष असून यावर्षी या स्पर्धेमध्ये विजेत्यांना रोख रुपये ३५००/- , रुपये २५००/- , रुपये १५००/- व रुपये १०००/- अशी रोख रकमेची पारितोषिके व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. शिवाय सहभागी प्रत्येक स्पर्धकास विशेष प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.स्पर्धा परीक्षण शुक्रवार दिनांक १८ आणि शनिवार दिनांक १९ सप्टेंबर २०२६ असे दोन दिवस केले जाणार असून क्रमाने येणाऱ्या पहिल्या ५० स्पर्धकांनाच स्पर्धेत सहभागी करून घेतले जाणार आहे. नाव नोंदणी बुधवार दिनांक १६ सप्टेंबर २०२६ पर्यंतच करावी.ऐनवेळी प्रवेश दिला जाणार नाही याची कृपया नोंद घेऊन त्वरीत आपली नाव नोंदणी पुढे दिलेल्या संपर्क नंबर वर करावी असे आवाहन प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री सचिन गणपतराव भोसले , उपाध्यक्ष श्री संजय गणपतराव भोसले आणि सचिव श्री हरिदास दिगंबर सावंत सर यांनी केले आहे. नावनोंदणीसाठी ९८९०४२०५२० , ९४२३२३२३२५ , ९६८९८६८२३३ या संपर्क नंबर्स वर संपर्क साधावा.
Tags
sakharwadi