सुरवडी गावातील ते भित्तीचित्र देत आहेे वसुंधरा वाचवण्याचा संदेश

महाराष्ट्र शासनाच्या पंचायत राज अभियाना अंतर्गत सुरवडी ग्रामपंचायतच्या माध्यमातून गावामध्ये स्वच्छ आणि सुंदर गावाकरिता अनेक ठिकाणी वेगवेगळी रेखाटलेली मनाला वेधून टाकणारी मोठी भित्ती चित्रे एक वेगळा संदेश देऊन जातात 
 अशाच स्वरूपाचे एक आगळे वेगळे चित्र येणाऱ्या जाणाऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे सुरवडी गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या इमारतीच्या समोर रस्त्याच्या कडेला रेखाटलेले आई आणि लहान मुलाचे इवलेसे रोप लावतानाचे चित्र सर्वांचेच लक्ष वेधून टाकत आहे जागतिक तापमान वाढल्याने आज वसुंधरेला वाचवण्याचे काम सर्वांनीच वृक्ष लागवडीतून करण्याची काळाची आहे तसे संस्कार आपल्या आई-वडिलांनी लहानपणीच करावेत असा हा संदेश देणारे हे भित्तिचित्र विशेष माहिती देऊन जात आहे पर्यावरण रक्षणाकरता 
 सुरवडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ शरयू जितेंद्र साळुंखे पाटील यांच्या कल्पकतेतून हे चित्र साकारण्यात आले असल्याचे सांगितले जाते

Post a Comment

Previous Post Next Post