पिंपळवाडी ता. फलटण येथील काटकर वस्ती लगत गायकवाड मळ्यातील महादेव मंदिरातील मागील आठवड्यात पुजेला लागणारे साहित्य चोरीला गेले आहे
यामध्ये तांब्याची कळसी व सव्वा फूटाची पितळी समयी आहे
ज्ञानेश्वर जयवंत गायकवाड यांच्या शेतातील हे महादेव मंदिर असून श्रावण महिन्यात हे मंदिर उघडे ठेवण्यात येत असते याचा फायदा ऊठवून. चोरट्याने संधी साधवली आहे
दोन दिवसापूर्वी संशयीत चोरटा फलटण ग्रामीण पोलिसांनी पकडला आहे
जिंती गावच्या हद्दीत असणारे बिराबा मंदिरात सुद्धा अशा प्रकारे चोरी झाली असल्यामुळे चोरटा मुद्दे मालासह सापडला असल्याचे पोलिसांच्या कडून समजते आहे
पिंपळवाडील जय संजय वेदपाठक असे तरुण चोरट्याचे नाव असून याने चोरी केल्याची कबूलीही दिली आहे.