फलटण - बारामती महामार्गावर सोमंथळी गावासाठी बस स्टॉप त्वरित बांधून देण्याबत



फलटण - बारामती महामार्गावर सोमंथळी गावासाठी बस स्टॉप त्वरित बांधून देण्याबत 
 अन्यथा 15 ऑगस्ट 2026 रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याबत स्वाभिमानी  शेतकरी संघटनेचा प्रशासनाला इशारा संघटनेचे फलटण तहसील यांना निवेदन
फलटण - बारामती रोड हा वर्दळीचा राष्ट्रीय महामार्ग आहे. या रस्त्यावर वसलेल्या सोमंथळी गावासाठी बस स्टॉप बांधून देण्याची जबाबदारी हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची आहे. गावातील शालेय विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिक व शेतकरी यांना बससाठी तासनतास उन्हात, पावसात उभे रहावे लागते. या ठिकाणी अपघाताचा धोका देखील मोठ्या प्रमाणात आहे.
हा बस स्टॉप आजपर्यंत बांधून देण्यात आलेला नाही तसेच बस स्टॉप च्या ठिकाणी दोन्ही साईडला गतिरोधक असावेत याबत आम्ही हायवे कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टरला लेखी व तोंडी निवेदने देऊन , अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. 
सोमनंथळी गावाची लोकसंख्या मोठी आहे आणि दैनंदिन 500 पेक्षा जास्त प्रवासी या ठिकाणाहून प्रवास करतात. त्यामुळे सुरक्षित बस स्टॉप ही अत्यावश्यक गरज आहे म्हणून आम्ही आपणांस लेखी निवेदनाद्वारे विनंती करतो की 15 ऑगस्ट 2026 पूर्वी सोमनथळी गावासाठी प्रवासी बस स्टॉप बांधून पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन द्यावे.
जर 15 ऑगस्ट 2026 सकाळी 11:00 वाजेपर्यंत बस स्टॉप बाबत ही लेखी आश्वासन दिले गेले नाही , तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सोमंथळी ग्रामस्थांच्या वतीने सोमंथळी बस टॉपच्या ठिकाणी रोडवर "रास्ता रोको" आंदोलन करण्यात येईल.* याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासन व हायवे कॉन्ट्रॅक्टर कंपनीची राहील.
आम्हाला आंदोलन करायचे नाही, परंतु शासन आणि प्रशासनाने आमच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागत आहे.
कृपया याची त्वरित दखल घेऊन बस स्टॉपचे काम सुरू करावे ही विनंती असे निवेदनात म्हटले आहे या वेळी 
धनंजय महामुलकर जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना सातारा नितीन यादव तालुकाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, फलटण विक्रम पवार शहराध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना, फलटण डॉक्टर रवींद्र घाडगे जिल्हसरचिटणीस 
प्रमोद गाडे युवक राज्य प्रवक्ते 
बाळासाहेब शिपुकले, बापूराव फरांदे, अशोक खलाटे,कांतीलाल अहिवळे, जगन्नाथ अहिवळे, अविनाश पोकळे, प्रल्हाद अहिवळे,आनंद आहिवळे इत्यादी उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post