सरदार वल्लभभाई व ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

आज शनिवार , दि.१५/०८/२०२६ रोजी सरदार वल्लभभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज एच एस सी वोकेशनल विभाग साखरवाडी येथे ८०वा भारतीय स्वातंत्र्य दिन आनंदाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. याप्रसंगी स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन श्री बापूसाहेब नाईक निंबाळकर , प्रशालेचे प्राचार्य श्री. गोपाळराव जाधव, पर्यवेक्षक निंबाळकर मॅडम , सर्व शिक्षक , शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी ,पालक व विद्यार्थी उपस्थित होते. सर्वप्रथम प्रशालेचे प्राचार्य श्री गोपाळराव जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. मान्यवरांच्या हस्ते श्रीमंत मालोजीराजे नाईक निंबाळकर व श्रीमंत शिवाजीराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रशालेचे क्रीडा शिक्षक नानासो तांबे सर यांनी प्रमुख पाहुण्यास ध्वजारोहणासाठी आमंत्रित केले व नंतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब नाईक निंबाळकर यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी ध्वजास व प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देऊन ध्वजसंचलन केले . सर्व विद्यार्थ्यांनी ग्रामपंचायत कार्यालय साखरवाडी येथे जाऊन ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना दिली व पुन्हा प्रशालेत आल्यानंतर विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतांवर कवायतीचे विविध प्रकार सादर केले. एसएससी परीक्षा मार्च २०२६ मध्ये विशेष प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थिनींना पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रशालेत घेण्यात आलेल्या मराठी व हिंदी विषयाच्या निबंध स्पर्धेतील यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला तसेच मराठी व इंग्रजी विषयाच्या निबंध व वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले. तसेच प्रशालेच्यावतीने नवसाक्षर योजनेअंतर्गत साक्षर झालेल्याचा सत्कार स्कूल कमिटीचे व्हाईस चेअरमन बापूसाहेब नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला .यावेळी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले . अशा प्रकारे ८० वा भारतीय स्वतंत्र दिन आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री टिळेकर सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post