साखरवाडी : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता चौथी, सातवी व आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत साखरवाडी शिक्षण संस्थेच्या प्राथमिक व माध्यमिक विभागातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. विद्यालयातील एकूण १६ विद्यार्थी जिल्हा शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये इयत्ता चौथीचे १ विद्यार्थी, इयत्ता सातवीचे ११ विद्यार्थी आणि इयत्ता आठवीचे ४ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
इयत्ता चौथी शिष्यवृत्ती परीक्षा – प्राथमिक विभाग
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण २२ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी २१ विद्यार्थी पात्र ठरले असून १ विद्यार्थिनी शिष्यवृत्तीधारक ठरली आहे.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी :
कुमारी प्रतीक्षा कैलास परकाळे
या विद्यार्थिनीला शिष्यवृत्ती समितीच्या कार्यवाह सौ. वनिता भागीत मॅडम तसेच समिती सदस्य सौ. पुनम बोंद्रे मॅडम व सौ. रेश्मा कर्वे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले. प्राथमिक विभागाचा शेकडा निकाल ७१% लागला.
इयत्ता सातवी शिष्यवृत्ती परीक्षा – माध्यमिक विभाग
माध्यमिक विभागातील शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण २९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १५ विद्यार्थी पात्र ठरले असून ११ विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक ठरले आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी :
१. कुमारी मयुरी मनोजकुमार राऊत
२. कुमार सर्वेश दत्तात्रय जगताप
३. कुमारी स्वरा विनोद कुचेकर
४. कुमार राजवीर मुकुंद फडतरे
५. कुमार वेदराज दिपक नलवडे
६. कुमारी ज्ञानेश्वरी नितीनकुमार रणवरे
७. कुमार प्रणव कुलदीप पिसाळ
८. कुमारी भार्गवी विशाल रणवरे
९. कुमारी दिया प्रकाश चव्हाण
१०. कुमारी श्रेया राहुल पवार
११. कुमार शौर्य महेश गायकवाड
या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती समितीच्या कार्यवाह सौ. विद्या रणवरे मॅडम, समिती सदस्य सौ. मीरा जगताप मॅडम व श्री. मिलिंद फडतरे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच इतर शिक्षकवृंदांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले. माध्यमिक विभागाचा शेकडा निकाल ५१.७२% लागला.
इयत्ता आठवी शिष्यवृत्ती परीक्षा – माध्यमिक विभाग
इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी एकूण १४ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. त्यापैकी १० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून ४ विद्यार्थिनी गुणवत्ता यादीत येऊन शिष्यवृत्तीधारक ठरल्या आहेत.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थिनी :
१. कुमारी ईश्वरी संजय जगदाळे
२. कुमारी चैत्राली मंगेश निकाळजे
३. कुमारी निसर्गा मिथुन कुऱ्हाडे
४. कुमारी दूर्वा महेश खराडे
या विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती समितीच्या कार्यवाह सौ. वंदना भोसले मॅडम तसेच समिती सदस्य श्री. एम. बी. लांडगे सर, श्री. एस. डी. वाघमोडे सर, सौ. एम. एच. थोरात मॅडम व सौ. एम. बी. गायकवाड मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकवृंदांचे संस्थेचे विश्वस्त समितीचे अध्यक्ष श्री. प्रल्हादराव (तात्या) साळुंखे पाटील, श्री. विक्रम आपटे, श्री. राजेंद्र भोसले, संस्थेचे अध्यक्ष श्री. धनंजय (दादा) साळुंखे पाटील, संस्था संचालक श्री. राजेंद्र शेवाळे व श्री. माणिक (अप्पा) भोसले यांनी अभिनंदन केले.
तसेच संस्थेच्या सचिव व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. उर्मिला जगदाळे मॅडम आणि प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. चांगण सर यांनी सर्व शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक व शिक्षकवृंदांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
साखरवाडी विद्यालयाच्या या उल्लेखनीय यशामुळे परिसरात व पंचक्रोशीत विद्यालयाचे, विद्यार्थ्यांचे तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे कौतुक व अभिनंदन होत आहे.
Tags
Sakharwadi