राजधानी सातारा येथे राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न



सातारा : राजे साळुंखे चालुक्य राजवंश प्रतिष्ठानच्या वतीने राजधानी सातारा येथे साळुंखे बंधू-भगिनींचे भव्य स्नेहसंमेलन उत्साहात पार पडले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. शिवाजी आप्पा साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार दीपक आबा साळुंखे होते.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांच्या हस्ते झाले. 
यावेळी माई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षा संगीता साळुंखे, प्रतिष्ठानचे महाराष्ट्र राज्य युवा अध्यक्ष प्रतिक साळुंखे, नागठाणे जिल्हा परिषद सदस्य अजित साळुंखे यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्नेहसंमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरले ते ‘राजे साळुंखे चालुक्य राजवंशाची गाथा’ या माहिती पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते झालेले अनावरण. या पुस्तिकेत चालुक्य राजवंशाच्या उदयापासून साळुंखे आडनावाची निर्मिती, पदनावे, कुलाचार तसेच साळुंखे परिवारातील प्रमुख ११ पदनावांतील आडनावांचा इतिहास सविस्तरपणे मांडण्यात आला आहे.

तसेच प्रतापगडचे वीर कमळोजी साळुंखे यांच्या शौर्यगाथेवर आधारित पोवाड्याचेही यावेळी अनावरण करण्यात आले. या उपक्रमामुळे उपस्थित साळुंखे बंधू-भगिनींमध्ये इतिहास आणि परंपरेबद्दल अभिमानाची भावना निर्माण झाली.आभार सातारा जिल्हाध्यक्ष रामराव साळुंखे यांनी मानले. स्नेहसंमेलनाच्या आयोजनासाठी शहराध्यक्ष प्रवीण साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष अभिजीत साळुंखे, महिला अध्यक्षा पल्लवी साळुंखे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

इतिहास, परंपरा आणि बंधुभाव जपत साळुंखे परिवाराला एका व्यासपीठावर आणणारा हा स्नेहसंमेलनाचा सोहळा उत्साहात आणि यशस्वीपणे संपन्न झाला.

Post a Comment

Previous Post Next Post