रस्त्यावर पडलेली खडी उचलण्यास उद्योजक संजय भोसले पुढे सरसावले

साखरवाडी प्रतिनिधी: गेले काही महिन्यापूर्वी पिंपळवाडी साखरवाडी येथील प्रमुख रस्त्यांच्या डांबरीकरणाचे काम चालू झाले होते परंतु काही कारणास्तव अंतिम टप्प्यात आलेले काम रखडल्याने या कामाची खडी रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्याने वाहन चालकांना विशेषता दुचाकी वाल्यांना आपली दुचाकी चालवताना मोठी कसरत करावी लागत होती यातूनच कित्येक दुचाकीस्वार या खडीवरून घसरून पडले सुद्धा रस्त्याचे काम रखडल्याने याबाबत नागरिकांनी असमाधान व्यक्त केले आहे खडी वरून घसरून पडण्याची मालिका चालू असता प्रसार माध्यमांनी याबाबत आवाज उठवला परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देण्याची गरज असताना प्रशासनाच्या माध्यमातून हे काम सध्यातरी होत नसल्याचे लक्षात येता साखरवाडी होळ पिंपळवाडी येथील मातोश्री कंट्रक्शन चे उद्योजक संजय भोसले यांनी रस्त्याच्या कडेला व रस्त्यावर पडलेली सैल खडी उचलण्याची सामाजिक बांधिलकी दाखवली आहे याबद्दल संजय भोसले यांचे नागरिकांच्या कडून आभार व्यक्त करण्यात आले आहे 
यावेळी सामाजिक कार्यकर्ते शरदराव जाधव उपस्थित होते 

Post a Comment

Previous Post Next Post