साखरवाडीत पिंपळवाडी भागतील रस्त्याचे डांबरीकरणाचे काम गेले कित्येक दिवस रखडल्याने रस्त्यावर व कडेला सैल खडीचा कच साठल्याने यावरुन वाहणांचे अपघाताचे प्रमाण वाढत चालले असून या सैल खडीचा बंदोबस्त तरी करा नाहीतर रस्ते लवकरात लवकर दुरुस्त करा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे
गेली दोन तीन महिन्यापूर्वी साखरवाडी पिंपळवाडी भागातील डांबरीकरणाचे काम चालू झाल्याने नागरिकांना समाधान वाटले होते अनेक दिवसापासून रस्त्याची कामे रखडली होती परंतु डांबरीकरणाचे काम जागेवरच थांबल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वर येथील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे डांबरीकरणाचा शेवटचा हात देणे बाकी असताना पुढचे काम रखडल्याने रस्त्यावरील खडी उखडू लागली आहे शिवाय सैल खडीचे ढिगारे रस्त्याच्या कडेला साचल्याने वाहन चालकाला समोरच्या वाहनांना साईट देताना वाहने घसरण्याचे प्रमाण वाढले आहे म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे
Tags
Sakharwadi