अत्यंत महत्त्वाची सूचना
उपसरपंच, सर्व सदस्य तसेच सुरवडी ग्रामस्थांना कळविण्यात येते की आज सायंकाळी ठीक ६:३० वाजता फलटण वन विभाग व बारामती वन विभागाच्या रेस्क्यू टीमचे अधिकारी बिबट्याच्या वावराबाबत जनजागृती व मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
स्थळ: सोळा फाटा, खवळे वस्ती
श्री. चंद्रकांत मोहन शिंदे यांचे निवासस्थान
या बैठकीमध्ये बिबट्याचा सामना झाल्यास काय करावे, कोणती खबरदारी घ्यावी, वन विभागाशी संपर्क कसा साधावा, तसेच नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्यात येणार आहे.
हा विषय आपल्या गावातील प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेशी संबंधित असल्याने उपसरपंच, सर्व सदस्य, युवक, शेतकरी, महिला व जास्तीत जास्त ग्रामस्थांनी वेळेवर उपस्थित राहून या महत्त्वपूर्ण मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा.
आपली उपस्थिती हीच आपल्या गावाच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाची आहे.
– सरपंच
ग्रामपंचायत सुरवडी