साखरवाडी 9 सर्कल परिसरातआज सायंकाळी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन साखरवाडी प्रतिनिधी साखरवाडी पिंपळवाडी सुरवडी माडकर मळा येथे बिबट्याचा वावर असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे असताना या भागात गोठ्यातील जनावरे व कुत्र्यावर हल्ला केला असल्याच्या बातम्या नुकत्याच ताज्या असताना आज रविवार दिनांक 12 रोजी नऊ सर्कल नजीक असणारे पराडकर वस्तीच्या शेतालगत आज सायंकाळी येथील रहिवाशांनी बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे सांगितले आहे यावेळी प्रत्यक्षपणे बिबट्याला पाहणाऱ्या नागरिकांची मोठी घाबरगुंडी उडाली आहे तरी या परिसरातील नागरिकांनी आज रात्री सतर्क राहण्याचे आवाहन वन अधिकाऱ्यांनी केली आहे
Tags
Sakharwadi