साखरवाडी प्रतिनिधी: गेली दहा ते बारा दिवस झाले सुरवडीच्या हद्दीतील खवळे वस्तीवर अफाट पसरलेल्या ऊस क्षेत्राच्या परिसरामध्ये बिबट्याचा वावर असल्याचे समजल्यानंतर फलटण वन खात्याचे अधिकारी व बारामती येथील रेस्क्यू टीमने प्रत्यक्षपणे त्या ठिकाणावरून संशोधन चालू केले असताना काल रात्री याच वस्तीवर गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांना या रेस्क्यू टीमच्या व फलटण वन खात्याच्या मार्फत बिबट्याच्या संदर्भात नागरिकांच्या मनामधील असलेले समज गैरसमज चित्रफितीच्या माध्यमातून समजावून सांगण्यात आले
यावेळी रात्रीच्या अंधारात रेस्क्यू टीम च्या वतीने बिबट्याच्या संशोधणार्थ आकाशातून ड्रोन फिरवण्यात आले परंतु बिबट्याचा काही ठाव ठिकाणा लागला नसत्याचे समजण्यात आले आहे
काही ग्रामस्थांना प्रत्यक्षपणे बिबट्याचे दर्शन या भागात झाल्याचे सांगण्यात आले असताना काल रात्री सायंकाळी सात वाजता या भागामध्ये रेस्कूचे आगमन झाले
सुरवडी ग्रामपंचायतच्या सरपंच शरयू जितेंद्र साळुंखे पाटील यांच्या हस्ते आलेल्या सर्व रेस्क्यू टीमचे व फलटण वन खात्याचे आभार मानून त्यांचा यथोचीत सत्कार करण्यात आला
यावेळी उपसरपंच सूर्यकांत पवार माजी उपसरपंच विजय खवळे साखरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अपर्णा बोडरे व साखरवाडी होळचे पोलीस पाटील सोनाली सचिन पवार माजी उपसरपंच समीरभाऊ भोसले दत्तात्रय बोडरे सचीन पवार सुरवडी ग्रामपंचायत सदस्य बाळूकाका नितीन जाधव तसेच चंद्रकांत शिंदे दीपक पन्हाळे राजेंद्र शिंदे पोपट धायगुडे अमोल इंगळे गणेश पवार फलटण वन खात्याच्या लोखंडे मॅडम व त्यांचे सर्व सहकारी बारामती रेस्क्यू टीमचे श्रेयस कांबळे व त्यांचे सर्व सहकारी उपस्थित होते.
Tags
Sakharwadi