पिंपळवाडी साखरवाडी तालुका फलटण येथील थोर साधू सद्गुरु योगीराज गुणानाथ महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये वारकरी सांप्रदायाची थोर परंपरा अजूनही जपली जाते येथेल विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये थोर साधू योगराज गुणानाथ महाराज यांची संजीवनी समाधी असून या ठिकाणी हरिनामाचा गजर नेहमीच चालत असतो येथील वारकरी सांप्रदायाची मोठी परंपरा असून या सांप्रदायांमध्ये पिंपळवाडीतील जाधव हवालदार कुटुंबातील ह भ प विठ्ठल महाराज जाधव हवालदार आम्ही त्यांना विठूभाऊ म्हणायचो
पंढरीची वारी अखंडपणे ज्यांनी केली ते विठूभाऊ आपल्यातून नुकतेच वैकुंठवासी झाले त्यांना पांडुरंगाचेच बोलावणे आले असे म्हणावे लागेल
प्रत्येक वारीमध्ये भाऊ ऊन वारा पाऊस अंगावर घेऊन सर्वांना बरोबर घेत विठू माऊलीच्या गजरात तहानभूक हरवून जात प्रपंचा कमी पण सांप्रदायाची त्यांना जास्त आवड आणि सांप्रदाय त्यांना अगदी चांगला भावला होता सतत भजन कीर्तन वारीमध्ये दंग असायचे ते आमचे भाऊ वारीला जायचे म्हटले की आधीपासून त्यांची तयारी चालायची सर्वांना भावणारे साधे सरळ असे हे व्यक्तिमत्व होते पंढरीची वारी निघाली की त्यांची आठवण झाल्याशिवाय राहत नाही
पताकांचा भार नामाचा गजर प्रेमाचा पाझर साधू संता राम कृष्ण हरी!
Tags
Sakharwadi