गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका लागू होणार!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर हिवाळी अधिवेशनात ही माहिती विधानसभेत दिली होती. त्यानुसार, गुटखा उत्पादन, साठवणूक, वाहतूक, वितरण आणि विक्री करणाऱ्या संघटित साखळीवर कठोर कारवाई करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल टाकलं आहे, असं प्रतिपादन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे.
गुटखा, तंबाखू किंवा निकोटीनयुक्त पानमसाला तसेच तत्सम तंबाखू-मिश्रित प्रतिबंधित अन्नपदार्थांच्या संघटित नेटवर्कविरुद्ध आता महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम, 1999 अर्थात मकोका अंतर्गत थेट कारवाई होणार. याबतचे स्पष्ट आदेश अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिले आहेत.
आरोग्यासाठी हानिकारक असलेल्या या विषारी पदार्थांच्या मुळावर घाव घालण्याचा हा गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता मकोका लागू
Tags
phaltan