सातारा येथील संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांच्या शिवशक्ती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीला डेअरी मुंबईचे माजी उपाध्यक्ष डी के पवार अण्णा यांनी आवर्जून भेट दिली त्याबद्दल संस्थेच्या वतीने डी के पवार यांचा पुष्पगुच्छ देऊन संस्थापक चेअरमन प्रभाकर साबळे यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती व राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाचे महाराष्ट्र चिटणीस रामभाऊ ढेकळे पत्रकार किसन भोसले तसेच या संस्थेच्या ज्योत्स्ना तुषार साळुंखे मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण सावंत लेखा परीक्षक प्रवीण माने इत्यादी उपस्थित होते
शिवशक्ती मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीच्या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यामध्ये मिळून एकूण चौदा शाखा विस्तार असून 224 कोटी व्यवसाय आहे तर एकूण ठेवी 120 कोटी असल्याचे चेअरमन प्रभाकर साबळे यांनी यावेळी सांगितले.
Tags
Phaltan