गाव विकासात सुरवडीची झेप; समितीची शाबासकी



गाव विकासात सुरवडीची झेप; समितीची शाबासकी

सुरवडी ता. फलटण येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या अनुषंगाने तालुकास्तरीय मूल्यमापन समितीमार्फत ग्रामपंचायतीची सविस्तर तपासणी करण्यात आली. या पाहणीस पंचायत समिती वैभववाडीचे सभापती मा. रावराणे साहेब, गटविकास अधिकारी मा. वाघ साहेब, विस्तार अधिकारी मा. जाधव साहेब, मा. कांबळे साहेब, मा. सपकाळ साहेब तसेच त्यांच्या समितीची उपस्थिती होती.

याचबरोबर फलटण पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा. बोंबले साहेब यांच्या नेतृत्वाखालील पथकानेही या तपासणीमध्ये सहभाग नोंदविला.
या पाहणीदरम्यान पंचायत समिती सदस्य मा. धनंजय दादा साळुंखे पाटील, सरपंच सौ. शरयू साळुंखे पाटील, उपसरपंच मा. सुर्यकांत पवार, सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत स्तरावरील शासकीय कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सरपंच सौ. शरयू साळुंखे पाटील यांनी ग्रामपंचायतीत राबविण्यात आलेल्या सर्व विकासकामांची सविस्तर माहिती समितीसमोर प्रभावीपणे सादर केली. त्यांनी पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छता उपक्रम, रस्ते विकास, विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी तसेच नागरिकाभिमुख उपक्रम यांचा आढावा देत ग्रामविकासातील प्रगती स्पष्ट केली. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कामगिरीबद्दल समिती सदस्यांनी विशेष समाधान व्यक्त केले.
समितीने सुरवडी ग्रामपंचायतीत राबविण्यात आलेल्या विविध विकासकामांची सखोल पाहणी केली. स्वच्छता, पाणीपुरवठा, प्रशासनिक कामकाज, ग्रामविकास उपक्रम तसेच योजनांची अंमलबजावणी याबाबत समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले.
अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी जेष्ठ मार्गदर्शक मा. प्रल्हादराव साळुंखे पाटील, मा. धनंजय दादा साळुंखे पाटील, मा. जितेंद्र साळुंखे पाटील तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य, शासकीय कर्मचारी आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

सदर पाहणीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजाला अधिक चालना मिळणार असून, आगामी काळात अधिक गुणवत्तापूर्ण व लोकाभिमुख विकासकामे राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post