एस बी जाधव सर यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

रावडी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक 
 एस बी जाधव सर यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न 

प्रतिनिधी/दादा जाधव 
      सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष 
श्रीमंत संजीव राजे नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व त्यांच्या हस्ते श्री एस बी जाधव सर यांचा सपत्नीक सेवापूर्ती सत्कार समारंभ रावडी शाळेमध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
        श्री एस बी जाधव सर यांनी फलटण एज्युकेशन सोसायटी मधील होळ माध्यमिक विद्यालय होळ सरदार वल्लभाई हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज साखरवाडी या शाळांमध्ये उपशिक्षक व रावडी माध्यमिक विद्यालय रावडी येथे मुख्याध्यापक पदावरून 31 मे 2026 रोजी ते सेवानिवृत्त होत आहेत सेवानिवृत्ती ही उन्हाळ्यात येत असल्यामुळे संस्थेच्या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी सोमवार दि 27 एप्रिल 2026 रोजी सकाळी ठीक नऊ वाजता सेवापूर्ती सोहळा व समारंभाचे आयोजन पण नियोजन करण्यात आले होते 
      याच संस्थेमध्ये सरांनी 1958 ते 31 मे 2026 पर्यंत एकूण 28 वर्ष प्रामाणिकपणे व निष्ठेने सेवा केली या सेवेचे फळ म्हणून त्यांच्या हातातून घडलेले विद्यार्थी विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत आहेत स्वतःची नोकरी हे प्रथम कर्तव्य मानून विद्यार्थी सेवा केली त्याचबरोबर कौटुंबिक नाती पै पाहुणे व मित्रपरिवार यांच्यामध्ये सुद्धा हसून खेळून मिळून मिसळून शक्य असेल तेथे सर्वांना सर्वतोपरी मदत करून दिलदार व्यक्तिमत्व म्हणून यांची ओळख आहे कार्यक्रम प्रसंगी श्रीमंत संजीव राजे यांनी त्यांच्या कार्याचे कौतुक करून त्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या
        त्याचबरोबर प्रशासन अधिकारी श्री निकम सर यांनी श्री जाधव सरांनी शाळेला केलेल्या मदतीमध्ये शाळेला दिलेले बोरवेल त्याच्यातून जगलेली झाड शाळेची सर्व रंगरंगोटी व विविध कार्यक्रमांमध्ये सढळ हाताने केलेल्या मदतीचे कौतुक केले श्री सतीश शिंदे सर यांचे मनोगत झाले 
           यावेळी फलटण एज्युकेशन सोसायटीचे 
भोजराज नाईक निंबाळकर, रावडी शाळेचे चेअरमन रणजीत रामचंद्र निंबाळकर,साखरवाडी स. व. हायस्कूल व जूनियर कॉलेजचे स्कूल कमिटी चेअरमन बापूसाहेब निंबाळकर तसेच सातारा जि. प.सदस्य गिरीश बनकर, स्कूल कमिटी सदस्य शरदराव रनवरे, चंद्रकांत पाटील,अनिल बोबडे, भगवानराव होळकर तसेच इतर मान्यवर उपस्थित होते
          या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री शेळके सर यांनी केले हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी प्राध्यापक श्री सतीश शिंदे सर सरदार वल्लभभाई हायस्कूल व जुनियर कॉलेज किमान कौशल्य विभाग प्रमुख तसेच श्री तुषार मोहिते सर- मुधोजी हायस्कूल व ज्युनियर कॉलेज, फलटण ,यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post