शेती महामंडळ कामगारांच्या प्रश्नासाठी रामराजे नावाचा लवाद नेमा : लक्ष्मणराव निंबाळकर

साखरवाडी प्रतिनिधी : ‌ महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या कामगारांना दोन गुंठे जागा मिळालीच पाहिजे या आशयाचे पत्र विराज सामाजिक प्रतिष्ठानचे  अध्यक्ष पत्रकार किसन भोसले यांनी प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र राज्य शेतकरी खंडकरी संघटनेचे कार्याध्यक्ष लक्ष्मणराव निंबाळकर यांना साखरवाडी येथील डॉक्टर खानविलकर यांच्या निवासस्थानी झालेल्या एका छोटेखानी कार्यक्रमात दिले 
यावेळी महानंदा डेअरी मुंबईचे मा. उपाध्यक्ष डि. के पवार श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन नितीन शाहूराजे भोसले ज्येष्ठ नागरिक संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर खानविलकर नाना व त्यांचे महाराष्ट्र राज्य शेतकरी खंडकरी संघटनेचे संचालक हरिभाऊ रुपनवर, डॉ. आनंदा जाधव, काकासो भोसले, एस के भोसले, रुपेश खानविलकर, विक्रम खानविलकर, फलटणचे भोसले वकील, संग्राम खानविलकर इत्यादी. उपस्थित होते 
यावेळी लक्ष्मणराव निंबाळकर म्हणाले की शेती महामंडळाच्या कामगारांच्या दोन गुंठे जागेचा प्रश्न हा श्रीमंत रामराजे समितीच्या अहवालात नमूद आहे तरीसुद्धा शेती महामंडळ कामगारांना दोन गुंठे जागा मिळवून देण्यासाठी शेतकरी कामगार यांना बरोबर घेऊन रामराजे नावाचा लवाद नेमला तर एक महिन्याच्या आत प्रश्न मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post