साखरवाडी प्रतिनिधी: साखरवाडी पिंपळवाडी येथील खंडकरी शेतकरी संघटनेचे नेते लक्ष्मणराव निंबाळकर तात्या यांची महाराष्ट्र राज्य खंडकरी शेतकरी संघटनेच्या कार्याध्यक्षपदी व जिंती येथील प्रगतशील बागायतदार हरिभाऊ रुपनवर यांची या संघटनेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल साखरवाडी येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष खंडकरी शेतकरी संघटनेचे जुने कार्यकर्ते डॉक्टर खानविलकर नाना यांच्या निवासस्थानी त्यांचे सुपुत्र विक्रम खानविलकर यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात लक्ष्मणराव निंबाळकर तात्या आणि हरिभाऊ रुपनवर यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी महानंद डेअरी मुंबईचे माजी उपाध्यक्ष डी के पवार श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन नितीनदादा भोसले फलटणचे भोसले वकील जयंत रुपनवर काकासो भोसले डॉक्टर आनंदा जाधव एस के भोसले संग्राम खानविलकर विक्रम खानविलकर रुपेश खानविलकर तसेच साखरवाडी येथील सर्व फुटबॉल खेळाडू व त्यांचे सहकारी ज्यष्ठ नागरिक संघाचे बापूराव गरुड डॉक्टर आगा इत्यादी उपस्थित होते
Tags
sakharwadi