उमेश शेठ पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

उमेश शेठ पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा 
साखरवाडी वार्ताहर : साखरवाडी येथील महालक्ष्मी कृषी सेवा केंद्राचे सर्वेसर्वा युवा उद्योजक कृषी सल्लागार व मार्गदर्शक उमेश शेठजी पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साखरवाडी येथे साजरा करण्यात आला या त्यांच्या वाढदिवसानिमित्त फलटण तालुक्याचे ज्यष्ठ नेते प्रल्हादरावजी साळुंखे पाटील महानंद डेअरी मुंबईचे माजी उपाध्यक्ष डी के पवार फलटण तालुका पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर साखरवाडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले व त्यांचे सहकारी मित्र यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी फरतडे साहेब अभियंता विजय नलवडे साखरवाडी परिसरातील शेतकरी व्यापारी राजकीय व सामाजिक क्षेत्रातील विविध मान्यवर व ग्रामस्थांनी उमेशशेठ पवार यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांच्या सोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा करून एक अनोखा आनंद व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post