अजितदादा म्हणजे आमचे काळीज

अजितदादा म्हणजे आमचं काळीज होतं अशा शब्दात आपल्या भावना साखरवाडी येथील श्री दत्त इंडिया कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी आमच्याशी बोलताना व्यक्त केल्या 
 यावेळी अजित जगताप साहेब यांना आपल्या भावनांना आवर घालता आला नाही ते भावना विवश होऊन म्हणाले की अजित दादा सारखा नेता या जगात पुन्हा होणार नाही दादा म्हणजे दूरदृष्टी असणारा नेता होता सर्वसामान्यांना बरोबर घेऊन जाणारा नेता होता तडफदार नेता होता त्यांची आपल्याला क्षणाक्षणाला व मनामनाला कायम आठवण राहील दादा सारखा नेता आपल्यातून निघून गेला याचीच अत्यंत खंत कायम वाटत आहे विकास काय असतो हे संपूर्ण राज्याला त्यांनी आपल्या बारामतीच्या माध्यमातून दाखवून दिला आणि विकासाचा एक आदर्श दादांनी बारामतीच्या माध्यमातून या जगापुढे ठेवला असल्याचे जगताप साहेब यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त करत असताना सांगितले .

Post a Comment

Previous Post Next Post