पै. दौलत भोसले यांची व्हा. चेअरमनपदी निवड

मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीच्या व्हा. चेअरमन पदी पैलवान दौलत भोसले यांची बिनविरोध निवड 
 साखरवाडी प्रतिनिधी : पिंपळवाडी साखरवाडी येथील मातोश्री विविध कार्यकारी सोसायटीच्या संचालक मंडळाची सभा संस्थेच्या सभागृहात भरली असता या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन महानंदा डेअरीचे माजी उपाध्यक्ष डी के पवार होते तर संस्थेचे माजी व्हा.चेअरमन कुमार मानसिंग कांबळे सोसायटीचे अधिपंच नामदेवराव साहेबराव भोसले मारुती जयसिंग माडकर संचालक प्रकाश विनायक पवार मारुती रामचंद्र जाधव चंद्रकांत हरिदास भोसले सचिन ज्ञानेश्वर पवार संजय परशुराम भोसले संग्राम ज्ञानेश्वर पवार उषा विठ्ठल रुपनवर भागीरथी भीमराव खोमणे हनुमंत निवृत्ती जगताप उपस्थित होते 
यावेळी सर्वांनुमते पैलवान दौलत भोसले यांची सोसायटीच्या व्हा. चेअरमनपदी एकमताने निवड करण्यात आली या निवडीबद्दल संस्थेचे चेअरमन डी के पवार यांनी दौलत भोसले यांचे पुष्पहार देऊन अभिनंदन केले पैलवान भोसले यांच्या या निवडीबद्दल पिंपळवाडी साखरवाडी पंचक्रोशीतून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post