साखरवाडी नाभिक समाजाच्या वतीने शूरवीर जीवा महाले यांची जयंती साजरी

होता जीवा म्हणून वाचला शिवा 
हे वाक्य इतिहासाच्या पानावर जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहेत तोपर्यंत राहणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये या शूरवीरांचे योगदान श्रेष्ठ ठरले आहे जीवाला जीव देणारी माणसं शिवरायांच्या काळात जन्माला आली असताना आपल्या राजासाठी प्राणांची आहुती हे मावळे द्यायला तयार होते इतके प्रेम ते आपल्या राजावर व स्वराज्यावर करत
 त्यापैकी वीर जीवा महाले हे या स्वराज्याच्या मातीत तयार झालेले शूर व्यक्तिमत्व होते आजही त्यांचे नाव मोठ्या अभिमानाने घेतले जाते प्रतापगडाच्या रणसंग्रामात वीर जीवा महाले यांनी छत्रपती शिवरायांचे प्राण वाचवले होते अफजलखानाच्या वधावेळी खानाचा अंगरक्षक  सय्यद बंडा छत्रपतींच्या वर चाल करून आला असता सय्यद बंडाचे हात वरचेवर छत्रपतींच्या जवळच असणाऱ्या जीवामहाल्याने त्यावेळी छाटले होते म्हणूनच होता जेव्हा म्हणून वाचला शिवा ही मन प्रचलित झाली या शूर वीर मावळ्याची 371 वी जयंती साखरवाडी नाभिक समाजाच्या वतीने साजरी करण्यात आली 
यावेळी दादासाहेब रणदिवे विलास पवार दादा राऊत रामदास राऊत कुमार गायकवाड मधुकर पवार अजित देवकर संजय देवकर लखन ठोंबरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post