गेले अनेक दिवस झाले फलटण तालुक्यातील सुरवडी पिंपळवाडी होळ परिसरातील ऊस क्षेत्रातील भागामध्ये बिबट्याने धुमाकूळ घातला असून शेतकऱ्यांचे जगणे मुश्किल झाले आहे अशातच काही दिवसापूर्वी बिबट्याने रात्रीच्या वेळी शेळ्या मेंढ्या वासरे व पाळीव कुत्र्यांच्या वर हल्ला करून ठार केल्याचे निदर्शनात आले आहे फलटण वनाधिकाऱ्यांनी या परिसरात वारंवार येऊन नागरिकांना सतर्कतेचे आवाहन केले असताना शेतामध्ये काम करणाऱ्या अनेक जणांना बिबट्याचे वारंवार दर्शन घडत आहे एवढेच काही तर बिबट्याच्या पिल्लांचेही दर्शन झाल्याचे अनेक जण सांगत आहेत यामुळे या भागामध्ये शेतकरी आपल्या शेतामध्ये जायला घाबरत असताना बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी वन अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांनी नुकतीच केली असताना काल संध्याकाळी डंकीन वस्तीवरील भागांमध्ये फलटण वन अधिकाऱ्यांच्या टीमने भेट दिल्यानंतर या भागातील नागरिकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने आज सायंकाळी फलटण वनरक्षक प्रधाने यांनी डंकीन वस्तीवरील त्याचा वावर असलेल्या क्षेत्रामध्ये बिबट्याच्या हालचाली टिपण्या करता त्या ठिकाणी कॅमेरे लावण्यात आले असल्याचे सांगितले आहे
डंकीन वस्तीवर बिबट्यासाठी लावले कॅमेरे
प्रतिनिधीसातारा सूर्य न्यूज
-
0