साखरवाडीच्या रत्नबन शिष्यवृत्तीचे विद्यार्थ्यांना वाटप

रत्नबन प्रतिष्ठान , साखरवाडी यांचेमार्फत दिल्या जाणाऱ्या रत्नबन शिष्यवृत्तीचे वाटप::::: साखरवाडी ( तालुका फलटण , जिल्हा सातारा ) येथील श्री रत्नबन प्रतिष्ठान यांचेमार्फत दिल्या जाणाऱ्या रत्नबन शिष्यवृत्तीचे वाटप आज बुधवार दिनांक 23 सप्टेंबर 2026 रोजी साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग या विद्यालयातील विद्यार्थ्यांना करण्यात आले. इयत्ता नववी उत्तीर्ण हुशार गरजू अशा एकूण चार विद्यार्थी विद्यार्थिनीना एकूण 11000/- रुपये रकमेच्या शिष्यवृत्तीचे वाटप साखरवाडी शिक्षण संस्थेच्या विश्वस्त समितीचे अध्यक्ष माननीय श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. शिष्यवृत्ती वाटपाचे हे सलग पाचवे वर्ष असून यावर्षी कुमारी अनुष्का ठोंबरे , न्यानेश्वरी नलवडे , मानसी मोरे आणि कुमार प्रतिक होळकर यांची निवड या शिष्यवृत्ती साठी करण्यात आली.याप्रसंगी प्रतिष्ठानचे मुख्य प्रवर्तक श्री बबनराव जाधव , सौ रत्नमालाताई जाधव , अध्यक्ष श्री विरेंद्र बबनराव जाधव , उपाध्यक्ष श्री विनोद बबनराव जाधव , सचिव श्री हरिदास सावंत सर , सौ रेश्माताई विरेंद्र जाधव , श्री विकास बबनराव जाधव , श्री शरदराव जाधव , श्री सुरेशनाना भोसले , श्री राजेंद्र पवार तसेच विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक श्री महादेव लांडगे , श्री विलास जाधव , सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी आणि विद्यार्थी उपस्थित होते.श्री प्रल्हादरावजी साळुंखे पाटील , श्री विरेंद्र जाधव आणि श्री हरिदास सावंत सर यांनी विद्यार्थ्यांना संबोधन केले.सूत्रसंचालन विद्यालयातील श्री सुनिल भोसले सर यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post