लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमधून उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ या पदावर साखरवाडी ग्रामपंचायतीचे माजी सदस्य प्रकाश चव्हाण यांचा मुलगा गणेश प्रकाश चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल 15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनानिमित्त कर्तव्यदक्ष वडील म्हणून प्रकाश चव्हाण यांचा साखरवाडी ग्रामपंचायतच्या वतीने माजी सरपंच विक्रम आप्पा भोसले यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला
यावेळी साखरवाडी ग्रामपंचायत सरपंच अपर्णा दत्तात्रय बोडरे ग्रामपंचायत अधिकारी महादेव आढाव यांच्यासह साखरवाडी ग्रामपंचायत सर्व सदस्य कर्मचारी साखरवाडी ग्रामपंचायतचे सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सदस्य ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मुस्लिम संघटनेचे पदाधिकारी सर्व शासकीय कर्मचारी शिक्षक सर्व मा. सैनिक संघटना, विद्यार्थी सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते नेतेमंडळी, साखरवाडी पोलीस स्टेशनचे अधिकारी व त्यांचे सर्व कर्मचारी, कामगार व्यापारी, डॉक्टर,शेतकरी सामाजिक कार्यकर्ते इत्यादी मोठ्या संख्येने उपस्थित होते
Tags
Sakharwadi