कुष्ठ रुग्णाचा आधारवड कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉक्टर ए ए आगा

कुष्ठ रुग्णाचा आधारवड कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉक्टर ए ए आगा 

 कुष्ठरोग सेवेतील दैवत अशी ओळख असलेले कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉक्टर अहमद अकबर आगा यांनी कुष्ठरोग सेवेत 38 वर्षाहून अधिक काळ त्यांनी गोरगरिबांना उपचारासह आधार दिला आहे त्यामुळे डॉक्टर आगा हे कुष्ठरुग्नांचे आधारवड झाले आहेत कुष्ठरोग तंत्रज्ञ डॉक्टर ए ए आगा यांचा जन्म लोणंद तालुका खंडाळा येथे झाला त्यांचे कुष्ठरुग्न उपचार शिक्षण जळगाव जिल्ह्यात होऊन सेवा वाई तालुका व फलटण तालुक्यात झाली काही काळ त्यांनी शासकीय सेवेत दुर्गम भागातील कुष्ठरोग रुग्णांची सेवा व औषध उपचार करण्याच्या सेवेला महत्व दिले प्रशासनाच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाकडे त्यांनी 38 वर्षे चांगली सेवा केली हे करत असताना शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने कुटुंब कल्याण योजनेसारख्या अनेक योजनात मोठे सहकार्य केले होते आरोग्य विभागाच्या ठिकाणी सुद्धा त्यांची एक चांगली सेवा घडली होती आपल्या सेवानिवृत्तीच्या काळानंतर सामाजिक कार्यात डॉक्टर आगा यांनी वाहून घेतले ते गणेश नगर साखरवाडी मधील सन्मित्र गणेश मंडळाचे अध्यक्ष होते ते मंडळाच्या वतीने गणेश उत्सव काळात वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा घेऊन बक्षीस वाटप करण्याचा कार्यक्रम घेत असत गणेश जयंती कार्यक्रमात तसेच सन्मित्र गणेशोत्सव मंडळाचे सर्व कार्यक्रम मध्ये सहकार्य घेऊन समाजात जनजागृती करून आदर्श देण्याचे काम सन्मित्र गणेशोत्सव मंडळाच्या वतीने अध्यक्ष या नात्याने त्यांनी केले वृद्ध असून तरुणासारखे काम करणारे आमचे आगा मामांना गणेशाचा आशीर्वाद लाभला हे खरे आहे हे करत असताना त्यांनी आपल्या कुटुंबाकडे कधी दुर्लक्ष केले नाही त्यांच्या मुलाकडून सुद्धा त्यांना वेळोवेळी सहकार्य मिळाले कुटुंबातही त्यांना भरभरून प्रेम मिळाले त्यांची मुले वेळोवेळी त्यांच्या तब्येतीची काळजी घेत असतात हे करत असताना आगा मामांचे वाढदिवस कुटुंबीयांच्या वतीने चांगल्या पद्धतीने व ज्येष्ठांच्या वतीने साजरे होत असतात आज त्यांनी वयाची 76 वर्षे पूर्ण केली आहेत जेष्ठ नागरिक असावा तर असा मामांच्या सारखा त्यांच्याकडून पुढील पिढीने युवकांनी एक आदर्श घेऊन आगा मामा सारखे काम करावे अशी अपेक्षा जेष्ठ नागरिक नेहमीच ठेवत असतात आपले वय झाले असले तरी मामा घरात बसून राहत नाहीत ते नेहमीच आपल्या सवंगड्यांची वयोवृत्तांची काळजी घेतात त्यांच्याकडे एक दोन दिवसाला जाऊन त्यांची विचारपूस करत असतात एवढेच नव्हे तर तरुणांची सुद्धा ते नेहमीच काळजी घेतात साखरवाडीतच नाही तर फलटण तालुक्यातील त्यांना ओळखत नाही असे ज्येष्ठ नागरिक नाहीत राजकीय सामाजिक क्षेत्रातील मंडळींची चांगले ते कनिष्ठ संबंध ठेवून आहेत आगा मामांना पुढील आयुष्य सुखी समाधानाचे जावो त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना

Post a Comment

Previous Post Next Post