फलटण तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी राहुल बोबडे

फलटण तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी श्री राहुल बोबडे यांची अभिनंदनीय निवड: फलटण एज्यूकेशन सोसायटी संचलित सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज , साखरवाडी मधील वरिष्ठ लिपीक श्री राहुल कृष्णात बोबडे यांची फलटण तालुका माध्यमिक शाळा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध अभिनंदनीय निवड करण्यात आली आहे. याबद्दल साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभागातील सेवानिवृत शिक्षक आणि साखरवाडी परिसरातील सामाजिक कार्यकर्ते श्री हरिदास सावंत सर यांचे शुभहस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.या प्रसंगी सरदार वल्लभभाई पटेल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य माननीय श्री गोपाळराव जाधव , वरिष्ठ शिक्षक श्री टिळेकर सर , साखरवाडी मुस्लिम समाज अध्यक्ष श्री फिरोज गुलमहंमद शेख , श्री जुबेर पठाण , श्री आरीफ मणेर , श्री अन्वर महात , श्री हरून महात , श्री परवेझ पठाण , श्री इम्रान शेख , श्री निहाल मुजावर , श्री दिलावर मेटकरी तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी , सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि मुस्लिम समाज साखरवाडी चे प्रमुख सदस्य उपस्थित होते.प्रास्ताविक श्री टिळेकर सर यांनी केले.श्री हरिदास सावंत यांनी श्री राहुल बोबडे यांच्या आजपर्यंतच्या शैक्षणिक कार्याचा आढावा थोडक्यात सांगून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.आभार श्री बावकर सरांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post