जलसंधारण अधिकारी गणेश चव्हाण यांचा सत्कार

साखरवाडी प्रतिनिधी : लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमधून उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट अ या पदावर साखरवाडी होळ सर्कल येथील  राजकीय व सामाजिक क्षेत्रातील सर्व परिचित असे व्यक्तिमत्व प्रकाश चव्हाण यांचे सुपुत्र गणेश चव्हाण यांची नियुक्ती झाल्याबद्दल पिंपळवाडी साखरवाडीतील सामाजिक कार्यकर्ते दिलीप बाबा पवार यांनी गणेश चव्हाण यांचा त्याला मिळालेल्या यशाबद्दल यथोचित सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या 
यावेळी प्रकाश चव्हाण बालाजी मेडिकलचे धनंजय काटकर इत्यादी उपस्थित होते 
गणेश चव्हाण यांनी आपल्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून परिश्रम घेऊन कष्टाने व जिद्दीने आपले ध्येय गाठण्याचा प्रयत्न करून या भागाचे व आई वडिलांचे नाव उज्वल करून समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे 
त्याला मिळालेल्या यशाबद्दल साखरवाडी पंचक्रोशीतील विविध मान्यवरांच्या कडून अभिनंदन होत असताना गावातील युवकांच्या कडून ठीक ठिकाणी  अभिनंदनाचे फलक ही लावलेले दिसत आहेत 

Post a Comment

Previous Post Next Post