आज दुपारी पिंपळवाडी येथील सिलेंडर वितरण कार्यालयासमोरुन एका भुरट्या चोराने लक्ष ठेवून गावातीलच एकाची टाकी पळवून नेली
कळालेल्या माहितीनुसार पिंपळवाडी गावातील एक व्यक्ती गॅस सिलेंडर वितरणच्या कार्यालयामध्ये सिलेंडर टाकी भरण्यासाठी आला कार्यालयाच्या समोर आपली टाकी ठेवून आत गेला होता तेवढ्या या भुरट्याने सिलेंडर टाकी पळवून नेली टाकी गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले असता सदरचा भुरटा ओळखीचा निघाला त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर व्यक्तीचा सिलेंडर घरी जाऊन आणून दिला
पोलिसांना ही माहिती कळाली असता पोलीस या भुरट्या चोराच्या घरी गेले होते परंतु आपल्याला दारूच्या निषेध काहीच कळले नसल्याचे प्रत्युत्तर या भुरट्या चोराकडून पोलिसांना मिळाले या चोराच्या विरोधात तक्रार देण्यासाठी कोणीच पुढे आले नसल्याने पोलिसांनी सुद्धा मनावर न घेता हे प्रकरण सोडून दिले असले तरी अशा भुरट्या चोरांना वेळीच कायद्याचा धाक दाखवायला पाहिजे असे नागरिकांचे म्हणणे आहे.