श्री जितोबा विद्यालय जिंती येथे नवागतांचे स्वागत उत्साहात संपन्न

  फलटण प्रतिनिधी : रयत शिक्षण संस्थेचे,श्री जितोबा विद्यालय जिंती तालुका फलटण या विद्यालयांमध्ये विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून विविध नवनवीन उपक्रम राबवले जातात. नवीन शैक्षणिक वर्षातील शाळेचा पहिला दिवस हा नवागतांचे स्वागत व नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सव याने साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे औक्षण करून गुलाबपुष्प व शिक्षण विभागामार्फत दिली जाणारी  मोफत पुस्तके  देऊन सत्कार करण्यात आला. सेल्फी पॉईंट वरती सर्व नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांचे फोटो काढण्यात आले. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांना हा आगळावेगळा असा प्रवेशोत्सवाबरोबर  आनंदोत्सव होता. यावेळी विविध स्पर्धा परीक्षेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार स्कूल कमिटीचे सदस्य राजेंद्र रणवरे, प्रकाशराव रणवरे, महादेवराव रणवरे, नवनाथ रणवरे, मुख्याध्यापिका सौ. माधुरी जाधव   यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी स्कूल कमिटी सदस्य प्रकाशराव रणवरे, महादेवराव रणवरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक ज्येष्ठ शिक्षक व समुपदेशक ताराचंद्र आवळे यांनी केले तर आभार सौ.विद्या जमदाडे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहीन हन्नुरे,जीवन देशमुख, अर्चना सोनवलकर, अंकुश सोळंकी, अमोल जाधव,मधुकर जगताप, राजेंद्र घाडगे यांनी प्रयत्न केले. विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना बिस्किट वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post