ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत. सरपंच पदाचा दावेदार म्हणून मी असणारच : दिलीपबाबा पवार

साखरवाडी ग्रामपंचायतची निवडणूक काही महिन्यांवर येऊन ठेपली असता प्रत्येक वार्ड मधून इच्छुकांनी उमेदवारी संदर्भात आपली तयारी दर्शवली असताना काही इच्छुक उमेदवारांनी तशा प्रकारचा प्रचारही चालू केला असून यामध्ये नागरिकांच्या गाठीभेटी वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि नागरिकांच्या समस्या वार्ड मधल्या विकास कामाबद्दल अडीअडचणी जाणून घेण्याचा प्रयत्न चालू असता आत्तापासूनच ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे अशा परिस्थितीमध्ये साखरवाडी पिंपळवाडी येथील राजे गटाचे कट्टर कार्यकर्ते व सामाजिक व्यक्तिमत्व असलेले दिलीपबाबा पवार यांनी साखरवाडी पिंपळवाडी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाच्या उमेदवारासाठी आपण  ही असणारच असे सांगितले आहे दिलीपबाबा पवार यांनी साखरवाडी पंचक्रोशी मध्ये वृक्षारोपण आणि विविध सामाजिक उपक्रमाद्वारे या भागातील जनतेपुढे आपली विशेष ओळख निर्माण केली आहे विधान परिषदेचे मा. सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या प्रेरणेतून अनेक ठिकाणी गावांमध्ये त्यांनी वृक्षारोपण करून वृक्ष संवर्धन ही चांगल्या पद्धतीने केले आहे आपण केलेल्या कामाची कुठेतरी दखल घेतली जाईल याची खात्री व अपेक्षा असल्याचे दिलीप बाबा पवार यांनी बोलून दाखवून जनता आपल्याला न्याय देण्याचा प्रयत्न करील असाही विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post