साखरवाडी प्रतिनिधी : शिवसेना राजे गटाचे कार्यकर्ते होळ सोसायटीचे मा. चेअरमन व विद्यमान संचालक पिंपळवाडीतील वार्ड क्रमांक सहा मधील लोकप्रतिनिधित्व करणारे निवृत्ती भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळवाडी साखरवाडी मध्ये चौका चौकात लावलेल्या फ्लेक्स बोर्डच्या संदर्भात राजकीय चर्चेला उधाण आलेले असताना दिसत आहे
ही राजकीय चर्चा , साखरवाडीच्या एसटी बस स्थानकावरही जोरदारपणे रंगू लागली आहे यावरून राजकीय तर्क वितर्क काढले जात आहेत साखरवाडी चे माजी सरपंच विक्रमसिंह भोसले यांच्या गटाकडून निवृत्ती भोसले यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा या फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून गावामध्ये झळकल्याने बघताच क्षणी मतदारांची पावले थांबत आहेत
साखरवाडी ग्रामपंचायतची निवडणूक काही महिन्यावर येऊन ठेपल्याने वार्ड क्रमांक सहा मधून निवृत्ती भोसले यांना विक्रम सिंह भोसले यांच्या गटाकडून ताकद मिळणार असल्याची जोरदारपणे चर्चा या फ्लेक्स बोर्डच्या माध्यमातून चाललेली दिसत असून भविष्यात साखरवाडी पिंपळवाडी भागातून शिवसेना राजे गटाची राजकीय भूमिका यापुढे काय असेल असाही सवाल या भागातील मतदारांना पडल्या असल्याची चर्चा चालू आहे.
Tags
Sakharwadi