वृक्ष भेट देऊन वाढदिवस साजरे करा डी के अण्णा पवार

जागतिक तापमानाचे परिणाम संपूर्ण जगावर दिसून येत असताना पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललेला आहे निसर्गानेही आपले रूप बदलले असून हे जर जागेवर आणायचे असेल तर पर्यावरण रक्षण केल्याशिवाय पर्याय नसल्याचे महानंद डेअरी मुंबईचे उपाध्यक्ष डी के पवार यांनी सांगितले आहे 
 डी के अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलेल्या छोटेखानी समारंभाच्या वेळी वृक्ष भेट देण्यात आली यावेळी डि के अण्णा यांनी सांगितले की गावागावातून अलीकडे वाढदिवस मोठ्या प्रमाणात साजरे होत असताना झाडे देऊन वाढदिवस साजरा करून ही झाडे गावागावातून लावून ती जतन करून वाढदिवसाची आठवण म्हणून ठेवावीत असे केल्याने पर्यावरणाचे रक्षण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून एखाद्याच्या वाढदिवसाला जाताना वृक्ष भेट देऊनच वाढदिवस साजरे करावेत असे आवाहन डि के पवार अण्णा यांनी यावेळी केले.

Post a Comment

Previous Post Next Post