अंकुशराव साळुंखे पाटील यांची जिल्हा मजूर फेडरेशनच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड

 फलटण प्रतिनिधी : सुरवडी तालुका फलटण येथील श्री दत्त ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष अंकुशराव साळुंखे पाटील यांची सातारा जिल्हा मजूर फेडरेशन चेअरमन पदी विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते अंकुशराव साळुंखे पाटील यांचा या निवडीबद्दल सत्कार करण्यात आला यावेळी शिवसेनेचे पदाधिकारी विराज खराडे सातारा जिल्हा परिषदेचे माजी सदस्य दत्ता अनपट शिवसेना फलटण तालुकाध्यक्ष पिंटू इवरे मजूर फेडरेशनचे माजी चेअरमन व्यंकटराव दडस सिकंदर डांगे सुरवडीचे युवा नेते किरण साळुंखे पाटील यांच्यासह फेडरेशनचे सभासद यांनीही अंकुशराव साळुंखे पाटील यांचा सत्कार केला सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अनिल देसाई जिल्हा फेडरेशनचे माजी अध्यक्ष जोरे साहेब फलटण पंचायत समितीचे माजी सभापती शंकरराव माडकर अभयसिंह नाईक निंबाळकर इत्यादी मान्यवरांनी फेडरेशनचे नवनिर्वाचित चेअरमन अंकुशराव साळुंखे पाटील यांचे अभिनंदन करून त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

Previous Post Next Post