पिंपळवाडी डंकीनवस्तीवर बिबट्याची भिती कायम

फलटण तालुक्यातील साखरवाडी पिंपळवाडी येथील डंकीन वस्तीवर मागच्या चार-पाच दिवसांपूर्वी बिबट्याने शेळीवर व बकरीवर हल्ला केला हे निदर्शनात आल्यानंतर प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी बिबट्याचे दर्शन काही नागरिकांना झाल्याने त्या भागातील शेतकऱ्यांच्या मनात बिबट्याची भीती कायम असल्याचे बोलले जात आहे 
 बिबट्याचा वावर काही दिवसापासून या डंकीन वस्तीवर असल्याने काही शेतकऱ्यांना आपल्या शेताच्या बाजूला बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत आहेत या ठिकाणी वन खात्यातील कर्मचाऱ्यांनी भेट दिली असता बिबट्या सदृश्य प्राणी या ठिकाणी फिरत असल्याचे त्यांनी सांगितले आहे बारामती तालुक्यातील पळशी गावातील मेंढपाळ या वस्तीवर आपल्या मेंढरांचा ताफा घेऊन आले असताना रात्रीच्या वेळी मुक्कामी मेंढपाळयांच्या तळावर बिबट्याने हल्ला करून मेंढी ठार केल्याचे निदर्शन आले होते ठार केलेले मेंढी बिबट्या तेथे टाकून पळाला होता परंतु त्याच रात्री त्याने मृत अवस्थेत असलेली मेंढी शेजारील उसाच्या शेतात नली असल्याचे नागरिकांच्या कडून समजत आहे त्यानंतर या मेंढपाळांनी आपला तळ बिबट्याच्या भीतीने दुसरीकडे हलवला असे असताना सध्या उसाच्या लागणी चालू आहेत शेतामध्ये शेतकऱ्यांची कामे पाऊस पडल्यामुळे चालू झाली आहेत परंतु शेतामध्ये जाताना शेतकरी व शेतमजुरांना आपला जीव मुठीत घेऊन कामे करावी लागत आहेत या ठिकाणी शेतकऱ्यांच्या मनामध्ये बिबट्याची भीती कायम असताना बिबट्याच्या बंदोबस्ताची मागणी येथील नागरिक करू लागली आहेत 

Post a Comment

Previous Post Next Post