रामदास नागटिळक यांच्या हस्ते पंढरपूर येथे डी के पवार यांचा सत्कार

पंढरपूर प्रतिनिधी  : अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अध्यक्ष तालुका पंढरपूर रामदास नागटिळक यांनी डी के पवार यांचा सत्कार केला
   राष्ट्रवादी काँग्रेस ग्रंथालय विभागाचे व या चळवळीचे नेते महानंद डेअरी मुंबई चे माजी उपाध्यक्ष डी के अण्णा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर तालुका अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष रामदास नागटिळक यांनी पंढरपूर येथे अण्णांचा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सत्कार केला
 थोर साधू योगीराज गुणानाथ महाराज यांची साखरवाडी पिंपळवाडी येथून पायी दिंडी पांडुरंगाच्या भेटी करता अधिक मासामध्ये दर तीन वर्षातून एकदा जात असते या दिंडी सोहळ्याला भेट देण्यासाठी डी के अण्णा पवार पंढरपूर येथे आले असताना रामदास नागटिळक यांनी अण्णांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
 ग्रंथालय चळवळीमध्ये डी के पवार यांनी महाराष्ट्रामध्ये अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात ग्रंथालय विभागाची चळवळ वाढवली सर्व ग्रंथालय चालकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला व तशी अण्णांची  त्यावेळी भूमिका होती सर्वांना सहकार्य करण्याची अण्णांची भूमिका  असायची असे नागटिळक यांनी सांगितले 
ग्रंथालयाच्या वेळोवेळी मीटिंगा घेणे सभा घेणे व त्यांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम डी के पवार हे करीत होते असेही त्यांनी शेवटी नमूद केले.

Post a Comment

Previous Post Next Post