पिंपळवाडी येथील खंडोबा भंडारा समितीच्या वतीने खंडोबा आळीतील खंडोबा मंदिरात खंडोबा माळसा लग्न सोहळा कार्यक्रम परंपरेप्रमाणे याही वर्षी आयोजित करण्यात आला असून
उद्या सोमवार दिनांक 20 4 26 रोजी अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा अध्यात्मिक विकास मार्ग( दिंडोरी प्रणित ) यांच्यावतीने माणिक दत्तोबा पवार व सौ वैशाली माणिक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी सात वाजता देवाचा रुद्राभिषेक सकाळी नऊ ते तीन पर्यंत मल्हारी सप्तसती वाचन व मल्हारी यागयज्ञ दुपारी चार ते सहा खंडोबा देवाचा पालखी सोहळा व मिरवणूक झाल्यानंतर देवाचा लग्न सोहळा व सात ते नऊ महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित केला आहे त्यानंतर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे खंडोबा भंडारा समितीच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे
Tags
Sakharwadi