आशुतोषकुमार यांच्या हस्ते साखरवाडी येथील स्थलांतरित शाखेचे उदघाटन

आयडीबीआय बँक साखरवाडी शाखेचे स्थानांतर दिनांक 13 मार्च 2026 रोजी शिवाई कॉम्प्लेक्स कारखाना ऑफिस शेजारी साखरवाडी येथे झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री आशुतोष कुमार सर (मुख्य महाप्रबंधक आणि आंचलिक प्रमुख पुणे क्षेत्र) यांच्या शुभहस्ते   आणि माननीय श्री. निलेश जाधव सर (मुख्य प्रबंधक सातारा विभाग)यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले. सदर कार्यक्रमाला बँकेचा कर्मचारी वर्ग, ग्राहक आणि हितचिंतक यांची उपस्थिती लाभली. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे शाखाप्रमुख माननीय श्री अजय सर यांनी केले.बँकेच्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच या सर्व योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन माननीय श्री अजय यादव सर शाखाप्रमुख साखरवाडी यांनी केले या वेळी साखरवाडी येथील उद्योजक राजेंद्र माने साखरवाडी बाजारपेठेतील प्रसिद्ध व्यापारी सचिन शेठ गांधी शिवाई कॉम्प्लेक्सचे मालक सुरेशनाना भोसले  बँकेचे हितचिंतक खातेदार ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post