खामगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात पार पडले

खामगाव येथे मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात पार पडले 
 साखरवाडी प्रतिनिधी :लायस मुधोजी चॅरिटेबल आय हॉस्पिटल यांच्यावतीने चिरंजीव शिववर्धन योगेश वारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले मोफत मोतीबिंदू तपासणी शिबिर उत्साहात पार पडले 
शनिवार दिनांक २८ फेब्रुवारी रोजी खामगाव येथील भैरवनाथ मंदिरात घेण्यात आलेल्या या शिबिरामध्ये शेकडो नेत्र रुग्णांनी आपला सहभाग नोंदवला होता यामध्ये रुग्णांची मोतीबिंदू तपासणी चष्म्याचे नंबर काढणे डोळ्यातील मांस काढणे, लासरू, जाळी काढणे इत्यादी तपासण्या झाल्या
 यावेळी गावातील लोकप्रतिनिधी हिंदूराव वारे बाळासाहेब कवितके गणपत बोडरे एडवोकेट सपना वारे अंकुश सावळकर इत्यादींची प्रमुख उपस्थित होती फलटण लायस क्लबचे अधिकारी गुरुनाथ पाटणकर डॉक्टर प्रांजल, निरंजन उजगरे सहायक पांडुरंग पाटणकर व त्यांचे सहकारी यांचे विशेष सहकार्य लाभले असल्याचे या शिबिराचे आयोजक योगेश वारे यांनी सांगितले

Post a Comment

Previous Post Next Post