शेतीसाठी काळाची गरज म्हणजे सेंद्रिय खत म्हणून कृषीकन्यांनी बनवले जीवामृत....

शेतीसाठी काळाची गरज म्हणजे सेंद्रिय खत म्हणून कृषीकन्यांनी बनवले जीवामृत....
 ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव आणि औदयोगिक जोड प्रकल्प 2025-26 अंतर्गत महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी कन्यांनी कांबळेश्वर मधील शेतकऱ्यांना "जीवामृत" हे सेंद्रिय खत योग्य पद्‌धतीने कसे बनवावे यांचे प्रात्यक्षिक दिले‌‌. 
     जर माती जपली तर शेती जपली जाईल. उत्पादन वाढीसाठी वेगवेगळे केमिकल शेतीमध्ये एकून मातीची /शेतीची सुपीकता दिवसोंदिवस कमी होत चालली आहे. एक दिवस या शेतीमध्ये कोणतेच पीक घेऊ शकणार नाही . जर ही परिस्थिती येवू नये असे वाटत असेल तर सेंद्रिय शेतीकडे वळाले पाहिजे. यासाठी उत्तम असे जीवामृत कसे बनवावे. त्याचे फायदे कोणते ; आहेत हे कृषकन्यांनी शेतक-यांना समजावले व यादरम्यान जीवामृत कसे बनवावे आणि त्यांचा योग्य वापर कसा करावा याचे प्रात्यक्षिक शेतक-यांना दिले.
  या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एन.ए. पंडीत व प्रा. एस. एम. साळुंखे तसेच डॉ.प्रा. जी.बी. अडसुळ आणि विषय शिक्षक प्रा. एन. एस धालपे यांचे कृषीकन्या कु.श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे , प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post