बारामती तालुक्यातील कांबळेश्वर येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संचलित कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव आणि औद्योगिक जोड प्रकल्प अंतर्गत कांबळेश्वर येथील शेतकऱ्यांना सांगवी मधील UCO बँक मध्ये कृषीकन्यांनी भेट दिली व शेतीविषयक कर्ज व पिक कर्ज योजने बद्दल माहिती घेतली, कृषीकन्यांनी कर्जाबद्दल जास्तीत जास्त शेतकऱ्यांना माहिती सांगितली तेथे उपस्थित कृषी अधिकारी कु. प्रतिक्षा तांबे व इतर सदस्य यांच्या उपस्थितीत उपक्रम राबवण्यात आला
या कार्यक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू.डी. चव्हाण, कार्यक्रम समन्वयक प्रा. निलिमा धालपे, कार्यक्रम अधिकारी व विषय शिक्षक प्रा. नितिशा पंडित व प्रा. सुरेश साळुंखे तसेच डॉ. प्रा. गणेश अडसूळ, यांचे कृषीकन्या कु. श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे, प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका जगताप, वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.
Tags
agriculture