सरदार वल्लभाई हायस्कूल चा माजी विद्यार्थी गणेश प्रकाश चव्हाण यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट-अ या पदावर निवड झाल्याबद्दल सरदार वल्लभाई हायस्कूल स्कूल कमिटीचे चेअरमन बापूसाहेब निंबाळकर यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रशालेच्यावतीने सत्कार करण्यात आला
साखरवाडी तालुका फलटण येथील सरदार वल्लभ हायस्कूल शाळेचा गणेश प्रकाश चव्हाण हा विद्यार्थी खूप मेहनतीने परीक्षा पास होऊन जलसंधारण अधिकारी म्हणून कार्यरत राहणार असल्याने याची दखल घेऊन सरदार वल्लभाई हायस्कूल या प्रशालेने २६ जानेवारी निमित्त गणेश प्रकाश चव्हाण या माजी विद्यार्थ्यांचा यथोचित सत्कार केला यानिमित्त होळ खामगाव साखरवाडी पिंपळवाडी पंचक्रोशीतून गणेश चव्हाण यांच्यासह वडील प्रकाश चव्हाण यांचेही अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे
या सत्कार समारंभ प्रसंगी प्रशालेचे सर्व शिक्षक विद्यार्थी पालक वर्ग उपस्थित होते.