गणेश प्रकाश चव्हाण यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त सत्कार


साखरवाडी वार्ताहर: साखरवाडी तालुका फलटण येथील सरदार वल्लभाई हायस्कूलचा माजी विद्यार्थी गणेश प्रकाश चव्हाण यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट-अ या पदावर निवड झाल्याबद्दल स्कूल कमिटीचे चेअरमन बापूसाहेब निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला 
साखरवाडी होळ सर्कल येथील सामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन गणेश चव्हाण यांनी खूप मेहनतीने परीक्षा पास होऊन जलसंधारण अधिकारी म्हणून यश मिळवले 
त्याबद्दल गणेश चव्हाण यांचे विविध क्षेत्रातून कौतुक होत असताना सरदार वल्लभाई हायस्कूल विद्यालयाने आपल्या शाळेतील विद्यार्थी म्हणून त्याचा २६ जानेवारी निमित्त‌ प्रशालेमध्ये सत्कार आयोजित केला होता यावेळी प्रशालेचे विद्यार्थी शिक्षक मुख्याध्यापक व पालक उपस्थित होते गणेश चव्हाण यांची उपविभागीय जलसंधारण अधिकारी गट या पदावर निवड झाल्याबद्दल साखरवाडी पिंपळवाडी खामगाव पंचक्रोशीतून त्याचे अभिनंदन होत आहे

Post a Comment

Previous Post Next Post