कृषीकन्यांनी कांबळेश्वर येथे केला प्रजासत्ताक दिन साजरा

कांबळेश्वर, ता. बारामती येथे महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्न फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविदयालय ,  फलटण येथील कृषीकन्यांनी ग्रामीण जागरुकता कृषी कार्यानुभव व औदयोगिक जोड़ प्रकल्प 2025 कार्यक्रमांतर्गत कांबळेश्वर येथे श्री विठ्ठल माध्यमिक विद्यालय कांबळेश्वर येथे केला प्रजासत्ताक दिन  साजरा .

या कार्यक्रमाची सुरुवात प्रभातफेरीने करण्यात आली. यामध्ये श्री वि‌ठ्ठल माध्यमिक विद्यालयाचे विद्यार्थी, प्राथमिक जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, गावातील नागरिक व कृषीकन्यांचा सहभाग होता. यामध्ये सामाजिक  घोषणांचा गजर करण्यात आला यादरम्यान तक्त्याद‌्वारे सामाजिक संदेश देण्यात आले. यानंतर शाळेमध्ये ध्वज फडकवून राष्ट्रगीत, महाराष्ट्र‌ राज्य गीत गाऊन ध्वजाला सलामी दिली. या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी- विद्यार्थीनी यांचे भाषण व शिक्षकांचे मनोगत सादर करण्यात आले तसेच विविध लेझीम प्रकार व कवायतीही घेण्यात आल्या. शालेय स्पर्धांमध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचे बक्षीस वितरण करण्यात आले. शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली.
   या कार्यक्रमासाठी कृषी महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. यु.डी चव्हाण , कार्यक्रम समन्वयक प्रा. एन. एस धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा.एन.ए.पंडित, कार्यक्रम अधिकारी प्रा.एस. एम. साळुंखे, तसेच ‌डॉ प्रा. जी. बी. अडसुळ यांचे कृषीकन्या कुमारी श्रावणी गायकवाड, विजया दिवाणे , प्राजक्ता जाधव, शितल जाधव, अपूर्वा जगताप, श्रुतिका  जगताप व वृषाली कदम यांना मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post